Posts

मी तुझा

शब्द माझे, विचार माझे, यमक माझे, कविता तुझी शाई माझी, पेन माझा, कागदही माझा, कविता तुझी इर्शाद माझा, शेर माझा, टाळ्याही माझ्या, मेहफिल तुझी पिंजरा माझा, कोकीळ माझी, पाऊस माझा, गाणे तुझे रंग माझा, कुंचला माझा, हातही माझा, चित्र तुझे ढोलकीतला खटका माझा, लावणीतला ठुमका माझा, घुंगरुतला नाद माझा, प्रेक्षक मात्र तुझे हेही माझे, तेही माझे, सगळेच माझे, तरीही तुझे तुला पाहणारे डोळे माझे, तुला स्मरणारे मन माझे, तुझ्याशी बोलणारे तोंडही माझे, अन मी फक्त तुझा

मी आहे

किती दूर आहेस माझ्या जरी तू मनाने तुला मी रोज भेटत आहे होत नसला जरी स्पर्श तूझ्या हातांना तुझ्या माथ्याला मी स्पर्श करीत आहे तुझे बोलणे जरी ऐकू येत नसले सर्वत्र तुझाच कल्लोळ आहे दिसत नसलीस जरी समोर तू आरशात मला तूच दिसत आहे कॉलेजातली गणिते सोडवता सोडवता मीच कोड्यात पडतो आहे गणिताच्या शेवटी तुझा विचार कोड्यातून सुखरूप सोडवत आहे तुझ्या DP च्या फोटो मधून तुला बघता बघता माझा DP बदलणे मी विसरत आहे असशील बदलत तुझा DP जरी तू तुझ्या प्रत्येक DP ची खबर मी ठेवत आहे दाखवत असलीस जरी शांत तू तुझ्या आतल्या उत्कंठेला मी ओळखून आहे कितीही नकार दिलास तरीही तुझ्यातला तुलाच मी भेटवणार आहे इथून पुढच्या तुझ्या प्रत्येक क्षणात मी त्या क्षणाचा भागीदार असणार आहे कितीही टाळलेस जरी मला तू माझ्या नावाचा उखाणा तू घेणार आहेे

कधी कधी वाटतं प्रेम नाहीयेच आपल्या आयुष्यात

कधी कधी वाटतं प्रेम नाहीयेच आपल्या आयुष्यात पहिल्यांदा झालं, कोवळं होतं तिझ सगळं ऐकणार माझं मन भोळ होत माझं मन बालिश तिझं मात्र फुललेलं पहिल्या प्रेमाच्या आशेपोटी माझं हृदय खुललेलं ती उठ म्हणे मी उठणार ती बस म्हंटल की मी बसणार सार्कशीतल्या वाघ होतो मी कारण माहीतच नव्हतं की गाडी कुठेतरी फसणार तिझ्या गोष्टी ऐकता ऐकता तिने खूप काही सांगितलं सांगता सांगता तिच्या दुसऱ्या Boyfriend च ही नाव सांगितलं संपलं सगळं अस म्हणत मीच घेतली माघार कशाला तिच वाईट करा शेवटी पहिलं प्रेम होतं यार जरा दिवसांनी प्रेम पुन्हा झालं यावेळी जरा विचार करून केलं सावध होतो मी एकदम चौकशी करून नीट नेलं तिचा मित्र बनलो मी माझीही मैत्रीण बनली ती मस्त मजेत दिवस घालवत एके दिवशी थांबली ती मला म्हणाली एकजण आवडतो कॉलेज सुटल्यानंतर कॅन्टीन मध्ये सापडतो पण रोजतर कॅन्टीन मध्ये मीच असतो मग मीसुद्धा मनातून खळबळून उठतो दिवस ठरतो वेळ ठरती म्हणते तुला दाखवते तो मला वाटतं मलाच propose मारणार अन खरंच surprise मिळतं हो मी तयार होऊन कॅन्टीन मध्ये ती पण तयार होऊन कॅन्टीन मध्ये माझ्या भावनां...

अरे पावसा तुझ्यात आहे तरी काय

अरे पावसा तुझ्यात आहे तरी काय टाकतोस मोहून तू सर्वांना घालतोस भुरळ तू सर्वांना ओले करुनि देह तयांचे चिंब चिंब मन देतोस सर्वाना कवींच्या मनातील ध्रुवतारा तू मवाळ हृदयाचा कलाकार तू प्रेमयुगलांच्या स्वप्नाचा भाग तू आविस्मरणीय क्षणांचा गुणाकार तू तुझ्या सहवासात तो पहिला स्पर्ष तुझ्या सानिध्यात ती पहिली मीठी काय जादू करतोस कोणास ठाऊक जुळतात तर सर्व रेशीमगाठी तुझ्या येण्याने नभ हे काळे जांभळे तुझ्या येण्याने निसर्ग कोवळे साद घालतोस सर्व युगाला कवीच्या मनात साजरे सोहळे अरे पावसा तुझ्यात नक्की आहे तरी काय

बडबड गीत

पावसात सदा सोसाट्याचा वारा अन रिमझिम धारा लगबग पाऊले पळती भरा भरा कडकड वीज अन धावपळ जरा विजेच्या ढोलाने अंगी उठतो शहारा आजीबाई नको म्हणता न्हेतो सदा गुरांना चराया आभाळाची काळवंड सोडून दैवाच्या भरवश्या गुरांच्या या मेजवानीत पाऊस झाला चालू सदा मात्र या विचारात की यांना मागे कसं घालू माळरानात टोळी अन त्या टोळीचा म्होरक्या आडोसा घेण्यासाठी त्या टोळीची दुर्दशा ओली ओली गुरे अन चिंब चिंब सदा मोसमाच्या खेळाने त्यांच्या छातीवर गदा जोर जोरात पळत सगळे पोचले ते घरा आजीबाईचा शब्द शेवटी ठरलाच खरा

गर्दी

इकडे गर्दी तिकडे गर्दी सगळीकडे गर्दीच गर्दी रस्त्यात गर्दी, मोकळ्यात गर्दी सगळीकडे गर्दीच गर्दी लोकांच्या तर मनातही गर्दी लोकांच्या नजरेतही गर्दी नसानसात ही अश्लील गर्दी सगळीकडे गर्दीच गर्दी स्वार्थाची गर्दी नात्यातही स्वार्थाची गर्दी प्रेमातही मैत्रीतसुद्धा स्वार्थाची गर्दी सगळीकडे गर्दीच गर्दी रस्त्यावर तुच्छतेची गर्दी गावागावात जातपताची गर्दी परकियांकडे राष्ट्रविरोधी गर्दी सगळीकडे गर्दीच गर्दी समाजाला विभागते तीच ही गर्दी माणुसकी तोडते तीच ही गर्दी प्रेमाच्या विरोधी तीच ही गर्दी झपाट्याने वाढतेय तीच ही गर्दी

एसटीचा तो प्रवास

पुण्याकडे येण्यासाठी बसायला गेलो एसटीत हात केला गाडीला चढलो एकदम ऐटीत तीन तासाचा प्रवास तसा फार कंटाळवाणा कारण सोबतीला माझे प्रिय हेडफोन्स नव्हते ना तरीही  मी बसलो एसटीत अन प्रवास चालू झाला एसटी तर एकदम तुडुंब भरलेली अगदी पुण्यातल्या PMT चा प्रवास करतो अगदी तशी मागची गर्दी पाहून मी तडक पुढे गेलो ड्राइव्हर शेजारी बसायला पण तिथेही एकजण बसला होता अन माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहत होता मी सुद्धा माझी नजर हटविली नाही अन एकदम सभय भाषेत त्याला म्हंटल " जरा तिकडे सरकता का" मागून घेतलेल्या अर्ध्या seat वर बसून साताऱ्यात आलो अन चमत्कार सगळी गाडी रिकामी. मी तडक गेलो अन एक मधली seat पकडली आता अपेक्षा एकंच होती की इथून पुढचा प्रवास सुखाचा व्हावा एसटी तर मोकळीच होती मग माझ्याही मनात आलं की कोणीतरी यावं , शेजारी बसावं , हळुहळु बघावं, गुलुगुलु बोलावं अन माझा उर्वरित प्रवास एकदम यादगार करून जावं गाडीत माणसे चढायला लागली मी तोंड पाडून तसाच बसलो होतो इतक्यात एक मुलगी आली अन कंडकटर ला विचारलं "ही गाडी स्वारगेट ला जाते ना ?" असे म्हणून ती बरोबर माझ्याच शेजारी येऊन बसली माझ्या ख...