अरे पावसा तुझ्यात आहे तरी काय
अरे पावसा तुझ्यात आहे तरी काय
टाकतोस मोहून तू सर्वांना
घालतोस भुरळ तू सर्वांना
ओले करुनि देह तयांचे
चिंब चिंब मन देतोस सर्वाना
कवींच्या मनातील ध्रुवतारा तू
मवाळ हृदयाचा कलाकार तू
प्रेमयुगलांच्या स्वप्नाचा भाग तू
आविस्मरणीय क्षणांचा गुणाकार तू
तुझ्या सहवासात तो पहिला स्पर्ष
तुझ्या सानिध्यात ती पहिली मीठी
काय जादू करतोस कोणास ठाऊक
जुळतात तर सर्व रेशीमगाठी
तुझ्या येण्याने नभ हे काळे जांभळे
तुझ्या येण्याने निसर्ग कोवळे
साद घालतोस सर्व युगाला
कवीच्या मनात साजरे सोहळे
अरे पावसा तुझ्यात नक्की आहे तरी काय
Comments
Post a Comment