गर्दी


इकडे गर्दी तिकडे गर्दी
सगळीकडे गर्दीच गर्दी
रस्त्यात गर्दी, मोकळ्यात गर्दी
सगळीकडे गर्दीच गर्दी

लोकांच्या तर मनातही गर्दी
लोकांच्या नजरेतही गर्दी
नसानसात ही अश्लील गर्दी
सगळीकडे गर्दीच गर्दी

स्वार्थाची गर्दी नात्यातही
स्वार्थाची गर्दी प्रेमातही
मैत्रीतसुद्धा स्वार्थाची गर्दी
सगळीकडे गर्दीच गर्दी

रस्त्यावर तुच्छतेची गर्दी
गावागावात जातपताची गर्दी
परकियांकडे राष्ट्रविरोधी गर्दी
सगळीकडे गर्दीच गर्दी

समाजाला विभागते तीच ही गर्दी
माणुसकी तोडते तीच ही गर्दी
प्रेमाच्या विरोधी तीच ही गर्दी
झपाट्याने वाढतेय तीच ही गर्दी





Comments