एसटीचा तो प्रवास

पुण्याकडे येण्यासाठी बसायला गेलो एसटीत
हात केला गाडीला चढलो एकदम ऐटीत

तीन तासाचा प्रवास तसा फार कंटाळवाणा कारण सोबतीला माझे प्रिय हेडफोन्स नव्हते ना
तरीही  मी बसलो एसटीत अन प्रवास चालू झाला
एसटी तर एकदम तुडुंब भरलेली अगदी पुण्यातल्या PMT चा प्रवास करतो अगदी तशी
मागची गर्दी पाहून मी तडक पुढे गेलो ड्राइव्हर शेजारी बसायला पण तिथेही एकजण बसला होता अन माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहत होता मी सुद्धा माझी नजर हटविली नाही अन एकदम सभय भाषेत त्याला म्हंटल " जरा तिकडे सरकता का"
मागून घेतलेल्या अर्ध्या seat वर बसून साताऱ्यात आलो अन चमत्कार सगळी गाडी रिकामी. मी तडक गेलो अन एक मधली seat पकडली आता अपेक्षा एकंच होती की इथून पुढचा प्रवास सुखाचा व्हावा
एसटी तर मोकळीच होती मग माझ्याही मनात आलं की कोणीतरी यावं , शेजारी बसावं , हळुहळु बघावं, गुलुगुलु बोलावं अन माझा उर्वरित प्रवास एकदम यादगार करून जावं
गाडीत माणसे चढायला लागली मी तोंड पाडून तसाच बसलो होतो इतक्यात एक मुलगी आली अन कंडकटर ला विचारलं "ही गाडी स्वारगेट ला जाते ना ?" असे म्हणून ती बरोबर माझ्याच शेजारी येऊन बसली माझ्या खुशीला अक्षरशः पार राहिला नव्हता
एसटी पुन्हा चालू झाली . ती माझ्या शेजारीच होती. ती सुद्धा पाहत होती, मी सुद्धा पाहत होतो, फरक एवढाच की मी तिच्याकडे पाहत होतो अन ती कंडकटर कडे बघत होती
हळू हळू मी बघतच होतो. वेळ जात होता. शायनिंग मारायची म्हणून पुस्तक काढून बसलो. नकळत पुस्तक निघालं fluid mechanics च त्यावर तीसुद्धा निरखून पाहू लागली मला वाटलं आपण बाजी मारली. मी शांतपणे वाचतोय अस दाखवत होतो तेवढ्यात तीच म्हणाली तू engineering ला आहेस का मी पण आहे mechanical ला. मोठ्या ऐटीत मी हो म्हंटलो. मग ती म्हणाली can you please tell me the meaning of P1  in the Bernoulli equation? मी 2 मिनिटे वरच बघितलं नाही अरे म्हंटल हे काय आपली गेम आपल्यावरच उलटतेय असा विचार करून तिला म्हंटल actually I also have same problem? That P1 is not getting understand by me. यावर ती खुश. तिला वाटलं मी पण अभ्यासू आहे. पण मीच म्हंटल जाऊदे आता जास्त नको बोलायला नाहीतर आपलं पितळ उघडं पडायचं. जर वेळाने पुणे आलं. ती पटकन माझ्या आधी उतरली अन मी उतरलो तेवढ्यात कुठे गायब झाली काय माहीत. जाऊदे म्हंटल मग मी आपल्या नशिबात एवढंच होतं. Bye.

Comments