आठवण

आज पुन्हा तुझी आठवण आली
मनातल्या त्या गाभाऱ्याला पुन्हा उत्तेजना मिळाली

उत्तेजना अश्रूंच्या स्वरूपात आली
एका क्षणात मस्तक स्तब्ध करून गेली

डोकं शांत, हृदय शांत सगळं काही स्तब्ध होत
अंधारलेल्या त्या आठवणींना पुन्हा उधाण येत होतं

तुझ्या त्या वाटेवर मी अगोदरच एकदा अडखळलोय
तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मर मर मेलोय

तू जवळ केलेस पण कधी जवळ आली नाहीस
शरीराने तर होतीस पण मनाने कधी माझी झाली नाहीस

तुझ्या त्या तीन शब्दांनी मी सातव्या आसमानात होतो
शपथ सांगतो प्रिये मी मनाने खरंच तुझा होतो

नाही म्हणालीस, संबंध तोडलेस
पण मी मात्र फार पुढे होतो
तू कधीच नात्यात पुढे आली नाहीस
पण मी कायम तिथेच होतो

मस्तक म्हणतंय शांत बस पण हृदय मात्र ऐकेना
कितिहा समजवा त्याला व तुझ्यावाचून करमेना

तू सोडून गेलीस सोबत हृदयही घेऊन गेलीस
खरंच सांगतो सखे मला श्वास घेता येईना

Comments