तु
तू
तू अशी गोष्ट आहेस जी मला वाटते की फक्त माझीच असावीस
माझी सोडून इतर कोणाचीही नसावीस
तुझ्याबरोबर बोलायचंय पण ते शब्द नाहीयेत,
तुझ्याबरोबर हसायचय पण ते प्रसंग नाहीयेत।
ते बोलके प्रसंग आणण्यासाठी माझे मन होतेय कासावीस
मला वाटतं तू माझी सोडून इतर कोणाचीही नसावीस
तुझ्या दोन गोड शब्दांसाठी माझे कान तरसलेत
तुझ्या प्रेमळ स्पर्शासाठी माझे हात आसुसलेत
तुझ्याकडे नजर वर करून बघतानाही माझा जीव होतोय कासावीस

तुझ्याशी बोलायचंय, तुझ्याशी खेळायचंय, तुझ्याशी मन मोकळं करायचंय
मन मोकळं करता करता नवं आयुष्य सुरू करायचंय
आयुष्याच्या वाटेवर चालताना माझे हृदय होतंय कासावीस

Comments
Post a Comment