मैत्री


मैत्री म्हणजे काय,

मैत्री म्हणजे ओळख नसताना झालेला पहिला संवाद
एकमेकांवर विश्वास ठेवून आयुष्यभर केलेली वाटचाल

मैत्री म्हणजे अस नातं जे सापडायला भाग्य लागतं
पण एकदा गवसलं की कायमचं आपलंसं होत

मैत्री म्हणजे अशी गोष्ट ज्याचं नाही कोणतं मूल्य
हिच्या तुलनेत सर्वच गोष्टी ठरतात साफ अमूल्य

मैत्रीच्या या नात्यात असते विश्वासाची तार
काही केल्या तुटत नाही ही असते मजबुत फार

मैत्री म्हणजे असं, की जिथं खुश असलेलं दाखवायला हसायची गरज नाही
तसेच दुःखी आहे हे दाखवायला डोळयांत अश्रूंची गरज नाही

रोज भेटायची गरज नाही, बोलायची गरज नाही
एकदा जुळली की आयुष्यभर टिकते ती असते मैत्री

जे कोठे मान्य नसत नाही ते इथे मान्य असतं
दोस्तीच्या या दुनियेत सगळं काही fair असतं.


Comments