मैत्री 🤞👦👨
आकाशाहून विशाल, समुद्राहुन अथांग मायेची ओढ, असते मैत्री । पाण्याहुन ओली, वाळवंटाहून सुकी प्रेमापेक्षा प्रेमळ, असते मैत्री । पर्वताहून उंच, दरीपेक्षा खोल सगळकाही व्यापनारी, असते मैत्री । सुखात हसणारी, दुःखात हसवणारी कायम साथ देणारी, असते मैत्री । सुर्याहून प्रखर, प्रकाशाहून तेज जीवाला जीव देणारी, असते मैत्री । मैत्री म्हणजे अशी गोष्ट जिची तुलना नाही शक्य अशक्य ही शक्य करणारी, असते मैत्री ।