Posts

Showing posts from April, 2020

मी तुझा

शब्द माझे, विचार माझे, यमक माझे, कविता तुझी शाई माझी, पेन माझा, कागदही माझा, कविता तुझी इर्शाद माझा, शेर माझा, टाळ्याही माझ्या, मेहफिल तुझी पिंजरा माझा, कोकीळ माझी, पाऊस माझा, गाणे तुझे रंग माझा, कुंचला माझा, हातही माझा, चित्र तुझे ढोलकीतला खटका माझा, लावणीतला ठुमका माझा, घुंगरुतला नाद माझा, प्रेक्षक मात्र तुझे हेही माझे, तेही माझे, सगळेच माझे, तरीही तुझे तुला पाहणारे डोळे माझे, तुला स्मरणारे मन माझे, तुझ्याशी बोलणारे तोंडही माझे, अन मी फक्त तुझा

मी आहे

किती दूर आहेस माझ्या जरी तू मनाने तुला मी रोज भेटत आहे होत नसला जरी स्पर्श तूझ्या हातांना तुझ्या माथ्याला मी स्पर्श करीत आहे तुझे बोलणे जरी ऐकू येत नसले सर्वत्र तुझाच कल्लोळ आहे दिसत नसलीस जरी समोर तू आरशात मला तूच दिसत आहे कॉलेजातली गणिते सोडवता सोडवता मीच कोड्यात पडतो आहे गणिताच्या शेवटी तुझा विचार कोड्यातून सुखरूप सोडवत आहे तुझ्या DP च्या फोटो मधून तुला बघता बघता माझा DP बदलणे मी विसरत आहे असशील बदलत तुझा DP जरी तू तुझ्या प्रत्येक DP ची खबर मी ठेवत आहे दाखवत असलीस जरी शांत तू तुझ्या आतल्या उत्कंठेला मी ओळखून आहे कितीही नकार दिलास तरीही तुझ्यातला तुलाच मी भेटवणार आहे इथून पुढच्या तुझ्या प्रत्येक क्षणात मी त्या क्षणाचा भागीदार असणार आहे कितीही टाळलेस जरी मला तू माझ्या नावाचा उखाणा तू घेणार आहेे